“वारकरी बांधवांसाठी महत्त्वाचे आवाहन, इंद्रायणी नदीच्या पूरस्थितीमुळे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांनी ८ जुलै २०२६ रोजीचा पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित उपस्थितीत आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. वारकरी भाविकांनी पालखी प्रस्थानासाठी आळंदीत येणे टाळावे व संस्थानच्या पुढील अधिकृत सूचनांनुसार पुढील मुक्कामस्थळी सोहळ्यात सहभागी व्हावे. आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या या निर्णयाला सहकार्य करूया. रामकृष्ण हरी !” असं श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने म्हटले आहे.
Views: 33



