डोंबिवली शहरातील श्री गणेश मंदिराजवळील पादचारी पुलावर दारुड्यांची आणि गुंडांची वाढती संख्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करत आहे. भाजप नगरसेविका रंजना पेनकर यांनी रामनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे साडेदहा वाजता काही दारू प्यालेले तरुण पादचारी पुलावर बसले होते. त्यावेळी, पुलावरून एकट्या चाललेल्या एका महिलेचा विनयभंग झाला.
या घटनेची माहिती मिळताच, भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष मितेश पेनकर यांनी तात्काळ रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश गवाडे यांच्याशी संपर्क साधला आणि परिसरात कडक कारवाईची मागणी केली.
Views: 64



