ठाणे: महापौर पदाविषयी रवींद्र चव्हाण यांचे मोठे विधान
केडीएमसीच्या महापौर पदाविषयी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठे विधान केले आहे. ठाण्याच्या राजकारणात या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून केडीएमसीत महायुतीचा महापौर बसणार असा दावा चव्हाण यांनी केला आहे. लोकांमध्ये संभ्रम आहे तो महायुतीचा म्हणजे नक्की कोणाचा? त्याचा उलगडा इतक्या लवकर करणे योग्य नाही. पारदर्शकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महापौर देणे गरजेचे आहे. तो भारतीय जनता पार्टी देईल असे ते म्हणाले.
Views: 124



