धारावी परिसरात मोठी आग : लोकल सेवा तात्पुरती बंद


धारावी परिसरात मोठी आग : लोकल सेवा तात्पुरती बंद

जन घोष वार्ता : मुंबईतील धारावी परिसरातील हार्बर लाईन जवळील नवरंग कंपाउंडमधील झोपड्यांना आज दुपारी अचानक भीषण आग लागली. आगीमुळे वांद्रे-माहीम दरम्यानची लोकल रेल्वे सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. घटनेनंतर किमान चार अग्निशमन गाड्या आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले; आग विझवण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग रेल्वे ट्रॅक्सच्या जवळ लागल्याने सुरक्षा उपाय म्हणून ओव्हरहेड वीजपुरवठाहि खंडित करण्यात आला. नुकसानीचे प्रमाण आणि आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


16
कृपया वोट करा

JAN GHOSH VARTAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!