जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यानंतर आता महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. विशेषतः पुणे आणि मुंबईत मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. आता हवामान विभागाने नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य 300 मिमी पावसाचा अंदाज वर्तवत रेड अलर्ट जारी केला आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये एकाच दिवसात सात टक्क्यांनी वाढ झाली असून, गंगापूर धरण 67.74% भरले आहे.
Views: 28



