ठाणे: भांडणात मध्यस्थी पडली महागात


ठाणे: भांडणात मध्यस्थी पडली महागात

उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ येथे शुक्रवारी मध्यरात्री भांडणात मध्यस्थी करण्यास गेलेल्या मनसे उपविभागप्रमुख अजय बागुल यांना नशेत धुत्त टोळक्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एका टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बागुल हे सीएसजी गॅस पंपाच्या रस्त्याने घरी जात असताना, पंपासमोरील चायनीस गाडीवर सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेले होते, त्यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली.


16
कृपया वोट करा

JAN GHOSH VARTAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!