आधार कार्डमध्ये मोठा बदल, डिसेंबरपासून नवे नियम लागू
जन घोष वार्ता संपादक प्रतिनिधी:
आधार कार्डमध्ये डिसेंबर २०२५ पासून मोठा बदल होणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) नवीन नियमानुसार कार्डवर केवळ धारकाची फोटो आणि सुरक्षित QR कोड दिसेल. नाव, पत्ता किंवा आधार नंबर आधार कार्डावरून काढण्याची योजना आहे. हा बदल गोपनीयता आणि डेटा गैरवापर टाळण्यासाठी करण्यात येणार आहे. QR कोडमध्ये सर्व गरजेची माहिती सुरक्षितपणे ठेवली जाईल आणि केवळ अधिकृत माध्यमातूनच ती व्हेरिफाय करता येईल.
Views: 120



