डोंबिवलीतील सर्पदंश प्रकरणातील हलगर्जीवर कठोर कारवाई


डोंबिवली : सर्पदंश झालेल्या दोन्ही मुलींचा कल्याण-डोंबिवलीमहानगरपालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दुर्दैवाने मृत्यू झाला होता. सप्टेंबर महिन्यात घडलेल्या या मृत्युकांडाची तांत्रिक चौकशी सुरू होती. चौकशी दरम्यान विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय जाधव यांना कर्तव्यात कसूर केल्याचा निष्कर्ष काढून यापूर्वीच निलंबित केले आहे. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी दिलेल्या आदेशांनुसार स्थापन केलेल्या चौकशी समितीने रुग्णालयातील पाच जणांवर ठपका ठेवला आहे.

यातील दोन कर्मचारी निलंबित करण्यात आले असून एका कर्मचाऱ्याला कामावर येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. बालकांचा अतिदक्षता विभाग चालविणाऱ्या बाह्यस्त्रोत संस्थेला ५० टक्के रक्कम कपात करण्याचा दंड ठोठावण्यात आला आहे. रुग्णालयाचे पर्यवेक्षीय काम प्रभावीपणे पार न पाडल्याबद्दल रुग्णालय प्रमुखांची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे.



16
कृपया वोट करा

JAN GHOSH VARTAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!