2
जन घोष वार्ता प्रतिनिधी:
डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर पोलिसांनी आपल्या हद्दीत हातभट्टीची गावठी दारू विक्री करणाऱ्या पाच जणांच्या अड्ड्यांवर छापा टाकून दारू अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. तसेच या दारू अड्डा चालकांच्या विरूध्द फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. अशाच पध्दतीने देवीचापाडा येथील सत्यवान चौकाजवळील हनुमान मंदिराजवळील भोईर सदन संकुलाजवळील नागरी वस्तीत नकली विदेशी दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर छापा मारावा आणि संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावेत अशी मागणी परिसरातील रहिवासी करत आहेत.
Views: 182



