माझी वर्दी द्या, घरी जायचंय; पोलिस अधिकाऱ्याने जीव दिला
उत्तर प्रदेशातील जालौन येथे एका पो लिस अधिकाऱ्याने आपल्या आयुष्याची अखेर केली. याप्रकरणी एका महिला कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे कानपूरः उत्तर प्रदेशातील कानपूरच्या जालौन कोंच पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने आपल्या आयुष्याची अखेर केली. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आपला जीव दिल्याची माहिती आहे. या प्रकरणात आता नवीन खुलासे समोर येत आहेत. अरुण कुमार राय असं जीव देणाऱ्या पोलिसाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस अधिकाऱ्याची एका महिला कॉन्स्टेबलसोबत जवळीक वाढली होती. सहकारी पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महिला कॉन्स्टेबलने स्टेशन इन्चार्जचे काही व्हिडिओ आणि चॅट्स सेव्ह करुन ठेवले होते, ते वापरून ती त्यांना सतत त्रास देत होते.आता याप्रकरणी या महिला कॉन्स्टेबलला कस्टडी घेण्यात आली आहे आणि सूत्रानुसार पुढचा तपास चालू आहे !
0



