मामाकडून दोन भाचींवर अत्याचार


प्रतिनिधी: नाशिकमध्ये मानलेल्या मामाकडून दोन अल्पवयीन भाचींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलींच्या आईने इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध बलात्कार, पोक्सो आणि अतिविशेष कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून सध्या मालेगाव येथे राहत होता आणि फिर्यादी महिलेचा मानलेला भाऊ म्हणून तो घरात वावरत होता. मुलींकडे लक्ष ठेवण्याच्या बहाण्याने त्याने धमकी देत अत्याचार केल्याचा आरोप आहे.


16
कृपया वोट करा

JAN GHOSH VARTAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!