जन घोष वार्ता प्रतिनिधी: मालेगावमधील पीडित कुटुंबाला १० लाखांची तात्काळ मदत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि निघृण हत्या ही घटना अत्यंत गंभीर, संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणारी आहे. या घटनेमुळे पीडित कुटुंबावर मानसिक, सामाजिक व भावनिक हानी झाल्याने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शासनामार्फत मनोधैर्य योजनेतून कुटुंबाला १० लाख रुपयांची तात्काळ आर्थिक मदत जाहीर केली आहे पण काही लोकांना हे प्रश्न पडला आहे की ही मदत आहे की किंमत कारण समाजात संतापाची लाट पसरली असून, आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
Views: 117



