दिव्यांग व वृद्धांसाठी रेशन घरपोच देण्याचा अभिनव उपक्रम
नाशिक जिल्हा प्रशासनाने दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना रेशनचे धान्य घरपोच देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली १,२३७कुटुंबांना प्रत्येकी २० किलो गहू व १५ किलो तांदूळ असे ३५ किलो धान्य शुक्रवारी घरपोच पोहोचविण्यात आले. या सेवेमुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला असून, नागरिकांनी प्रशासनाच्या या संवेदनशील उपक्रमाचे कौतुक केले आहे.
,
Views: 125



