कल्याण-डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी!
ठाकुर्ली येथील 90 फिट रोड परिसरात इस्कॉन मंदिराची स्थापना होत असून, भक्तांसाठी हे एक मोठे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र ठरणार आहे. या मंदिरामुळे परिसरातील नागरिकांना पूजा-अर्चा, हरिनाम संकीर्तन, भगवद्गीता प्रवचने, सत्संग तसेच विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचा लाभ मिळणार आहे.
विशेष म्हणजे, या मंदिरामुळे तरुण पिढीला भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि संस्कारांची ओळख होण्यास मदत होईल. तसेच कल्याण-डोंबिवली परिसराच्या धार्मिक वैभवात आणखी भर पडणार आहे. नागरिकांमध्ये या उपक्रमाबद्दल उत्साहाचे वातावरण असून, मंदिराच्या उभारणीची आतुरतेने प्रतीक्षा केली जात आहे.
Views: 56



