महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि प्रभावी लोकनेते अजित पवार यांचा बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला असून राज्यभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी बारामतीत अंत्यसंस्कार होणार असून विद्या प्रतिष्ठान मैदानावर रात्रभर अंत्यदर्शनाची व्यवस्था होती. अंत्यसंस्काराला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे
Views: 118



