जन घोष वार्ता प्रतिनिधि: शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वादंग सुरू झाले आहे. पदाधिकाऱ्यांची खेचण्याची सुरुवात शिवसेनेने केली होती, मात्र आता भाजपही प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. ‘तुम्ही आमचा एक घेणार तर आम्ही तुमचे चार घेणार,’ असा इशारा भाजपने दिला आहे. यापुढे पक्ष प्रवेशावेळी मला विचारा, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली आहे, असे परब यांनी सांगितले.
Views: 99



